युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Iran US war latest news : इराणने अमेरिकेचा शस्त्रसंधी प्रस्ताव फेटाळून लावल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. शांतता चर्चा अपयशी ठरल्याने पुन्हा युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
Donald Trump Warn Iran
Donald Trump Warn Iransaam tv
Published On

रोहित कदम

इराण-अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा पुन्हा एकदा फिसकटली. इतकंच नाहीतर इराणनं अमेरिकेचा प्रस्तावदेखील धुडकावून लावलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नरमले असले तरी इराणचा आक्रमक पवित्रा कायम आहे, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. इस्लामाबादमधील शांतता चर्चेला इराणनं केराची टोपली दाखवलीये. इराण होर्मुझवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी इरेला पेटलाय. त्यातच आता इराण चर्चेला उपस्थित न राहिल्यानं ट्रम्प यांच्यावर शांतता चर्चा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावलीये. इतकंच नाहीतर इराणनं आक्रमक पवित्रा कायम ठेवत अमेरिकेची शस्त्रसंधी धुडकावून लावलीये.

Donald Trump Warn Iran
Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

शस्त्रसंधी इराणनं फेटाळली

अमेरिकेची शस्त्रसंधी इराणच्या संसद अध्यक्षाचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनी फेटाळून लावलीये. इतकंच नाहीतर हारलेला देश अटी लादू शकत नाहीत, अस म्हणत इराणनं अमेरिकेला डिवचलंय. तसंच, पराभूत मानसिकता असलेले दुसऱ्यांवर अटी लादू शकत नाही. तसंच, शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी काहीच नाही. अमेरिकेकडून सुरू असलेली कोंडी बॉम्ब वर्षावच आहे. या कोंडीविरुद्ध युद्ध सुरूच ठेवले पाहिजे, असं इराणने ठणकावुन सांगितलंय.

Donald Trump Warn Iran
पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

खरंतर, इराणनं आक्रमक पवित्रा कायम ठेवला असला तरी डोनाल्ड ट्रम्प इराणच्या प्रस्तावाची वाट पाहताहेत. मात्र, होर्मुझच्या जलमार्गातून नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश ट्रम्प यांनी कायम ठेवलेत. त्यामुळे होर्मुझमधील सागरी नाकेबंदीवरून दोन्ही देशांतील तणाव सुरूच आहे. एव्हंढच नाहीतर ट्रम्प यांची शरणागती म्हणजे अचानक मोठा हल्ला करण्याचा कुटील डाव असल्याची भीतीही इराणनं व्यक्त केलीये. त्यामुळे इराण-अमेरिका यांच्यातील शांततेचा मार्ग आता अधिक खडतर होत चाललाय. अशावेळी इराणनं अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळल्यानं पुन्हा युद्धाला तोंड फुटणार का ? आणि या युद्धाच्या आगीत आखाती देश पुन्हा एकदा होरपळणार का ? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

Donald Trump Warn Iran
४ दिवस पावसाचे! पुण्यात अचानक गारांचा तडाखा, कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com