४ दिवस पावसाचे! पुण्यात अचानक गारांचा तडाखा, कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

Unseasonal rain Maharashtra : पुण्यात अचानक गारांसह पावसाने हजेरी लावून उष्णतेपासून दिलासा दिला. मात्र गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राज्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Unseasonal Rain in Pune
Unseasonal Rain in PuneSaam TV
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

IMD weather alert Maharashtra : कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने ओलेचिंब केले. मात्र, पावसापेक्षा गारांच्या तडाख्याने पुणेकरांची अधिक त्रेधातिरपट उडाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. त्यातच हवामान विभागाने राज्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. (Pune weather today rain)

आज पुण्यात उन्हाच्या झळांऐवजी पावसाच्या सरी कोसळल्या. अलका टॉकीज चौकापासून ते कोथरूडपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी पावसापेक्षा टपोऱ्या गारांचा वर्षावच जास्त पाहायला मिळाला. कोथरूड, वारजे, डेक्कन, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे या भागात गारांचा धुव्वाधार पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास पुण्यातील अनेक परिसरांना पावसाने झोडपले.

मावळातही गारांचा तडाखा

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथेही अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. परिसरात ढगांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पाच वाजता पडलेल्या गारांमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला. या अनपेक्षित पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि कांदा या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून बळीराजा चिंतेत आहे.

Unseasonal Rain in Pune
PNG बाबत महत्त्वाची माहिती; महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून मोठी अपडेट

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे

महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून पुढील ४ दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain in Pune
RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर आणि यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने हवामानात हे बदल होत आहेत. एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे राहणार असून, काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

Unseasonal Rain in Pune
ZP Election : २२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार, शिवसेनेकडून १२ नेत्यांवर मोठी जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com