Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Gujarat Valsad Accident: गुजरातच्या वलसाडमध्ये लग्नासाठी निघालेल्या पिकअप व्हॅनचा अपघात होऊन ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Gujarat accident
Gujarat accident
Published On

Gujarat accident death Toll : गुजरातमधील वलसाडमध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात झाला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे.ब बुधवारी सायंकाळच्या वेळी ही दुर्घटना घडली. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० जणांना घेऊन पिकअप व्हॅन लग्नासाठी निघाली होती. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटली. या अपघातानंतर ६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेवर दुख व्यक्त केले.

स्थानिक पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तात्काळ जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्याशिवाय अपघातग्रस्त वाहनाला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले. अपघाताचे नेमकं कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

Gujarat accident
पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

पोलिसांच्या माहितीनुसार, व्हॅनमधून गिरनारा गावातून ३० लोक एका लग्नासाठी जात होते. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अन् गाडी उलटली. या दुर्घटनेत २ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. करपडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एन. वंझा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gujarat accident
४ दिवस पावसाचे! पुण्यात अचानक गारांचा तडाखा, कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, तसेच पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Gujarat accident
RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com