Pakistan: पाकिस्तानला मोठा हादरा! भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला, ४ हवाई तळ उद्ध्वस्त; पाकड्यांचा दावा| VIDEO

India Pakistan War: पाकिस्तानकडून गेल्या ३ दिवसांपासून भारतावर हल्ले सुरू आहे. या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करत ४ हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला.
Pakistan: पाकिस्तानला मोठा हादरा! भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला, ३ हवाई तळ उद्ध्वस्त
India Pakistan WarSaam Tv
Published On

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने ही मोठी कारवाई केली होती. पण ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेला पाकिस्तान गेल्या ३ दिवसांपासून भारतावर सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करत आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या या युद्धबंदीच्या उल्लंघनाला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेत पाडले जात आहेत. जम्मू-काश्मीरपासून ते गुजरातपर्यंत पाकिस्तानने शुक्रवारी रात्री २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानामध्ये मोठे स्फोट केले. भारताने पाकिस्तानमधील ४ हवाई तळांना लक्ष्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांमध्ये हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्य देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. अशात पाकिस्तानातील इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. तर रावळपिंडीतील एअरबेसजवळही स्फोट झाला आहे. भारताने पाकिस्तानात मोठे स्फोट केले त्यामुळे पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. भारताने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळ, मुरीद हवाई तळ आणि रफीकी हवाई तळासह आणखी एका हवाई तळावर हल्ला केला.

Pakistan: पाकिस्तानला मोठा हादरा! भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला, ३ हवाई तळ उद्ध्वस्त
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मध्यरात्री भ्याड हल्ला, ड्रोनने 26 ठिकाणं टार्गेट, घरांच्या भिंती पडल्या, वाहनांच्या काचा फुटल्या | VIDEO

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नूर खान हवाई तळावर मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटात अनेक पाकिस्तानी विमाने उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्करानेही या स्फोटाची पुष्टी केली आहे. डीजी आयएसपीआर म्हणाले की, सर्व पाकिस्तानी मालमत्ता सुरक्षित आहेत. भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात रफीकी हवाई तळालाही लक्ष्य करण्यात आले. पंजाब प्रांतातील शोरकोटजवळ स्थित हे हवाई तळ पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पाकिस्तानी हवाई दलाच्या मिराज-५ लढाऊ विमानांचे तळ आहे.

Pakistan: पाकिस्तानला मोठा हादरा! भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला, ३ हवाई तळ उद्ध्वस्त
India Pakistan War: पाकड्यांची नापाक चाल! दिल्लीवर डागले 'फतेह-२' क्षेपणास्त्र; हल्ल्याचा डाव लष्कराने उधळून लावला

इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीसह पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये भारताने प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले. भारताने पाकिस्तानमधील तीन हवाई तळांनाही लक्ष्य केले. पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये भारताद्वारे स्फोट करण्यात आले. रावळपिंडीमध्ये दोन आणि लाहोर आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी एक स्फोट करण्यात आला.

डायरेक्टर जनरल इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कबुल केले की, भारताने नूर खान हवाई तळ आणि रफीकी हवाई तळावर हल्ला केला. नूर खान हवाई तळ रावळपिंडीमध्ये आहे. रफीकी हवाई तळ पंजाबमधील शोरकोट येथे आहे. तर मुरीद हवाई तळ पंजाबमधील चकवाल येथे आहे.

Pakistan: पाकिस्तानला मोठा हादरा! भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला, ३ हवाई तळ उद्ध्वस्त
India Pakistan Tensions : तणाव वाढला! रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर भारताचा हल्ला, पाकिस्तानचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com