India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, काय आहेत वैशिष्ट्ये?

Akash Missile: भारत- पाकिस्तामधील तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्यूत्तर दिले जात आहे. आकाश क्षेपणास्त्राद्वारे भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. आकाशची भूमिका महत्वाची ठरली.
India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, पाहा VIDEO
Akash MissileSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत करण्यात आलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय बनावटीचे 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. या क्षेपणास्राद्वारे पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव भारताने उधळवून टाकला.

'आकाश' पृथ्वी म्हणजेच जमीन ते आकाशात उडणारे क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा वापर भारतीय सशस्त्र दलांनी भारतीय लक्ष्यांवर पाकिस्तानकडून करण्यात येणारे हल्ले परतवून लावण्यासाठी प्रभावीपणे केला. भारतीय सैन्य आणि हवाई दल दोघांकडेही ही क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तान सीमारेषेवर तैनात आहे अशी माहिती आहे.

India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, पाहा VIDEO
Operation Sindoor : अब इस्लामाबाद का नंबर! पाकिस्तानच्या राजधानीवर मिसाइल्सचा वर्षाव, अर्धा पाकिस्तान काळोखात

स्वदेशी विकसित 'आकाश' 'सर्फेस टू एअर' क्षेपणास्त्र प्रणाली ही एक मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा आहे. जी अनेक हवाई धोके टाळण्यासाठी क्षेत्रीय संरक्षण प्रदान करते. ही प्रणाली फिरती, अर्ध-स्थिर आणि स्थिर अशी असुरक्षित संसाधने संरक्षित करते. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्व प्रकारच्या जमिनीवर हालचाल करण्याची क्षमता असून ती स्वतंत्र व गट पद्धतीने कार्य करू शकते.

India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, पाहा VIDEO
Operation Sindoor : पाकड्यांनी १५ शहरांना टार्गेट केलं, भारताने ड्रोन हल्ला हाणून पाडला | VIDEO

वास्तविक वेळेतील बहु-संवेदी माहिती प्रक्रिया आणि प्रगत धोका मूल्यांकन क्षमतेमुळे, आकाश प्रणाली कोणत्याही दिशेने एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करू शकते. या प्रणालीमध्ये आदेश मार्गदर्शन प्रणालीचा वापर होतो आणि ती क्षेपणास्त्रांना लक्ष्यावर पोहोचेपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी फेजड-अ‍ॅरे रडार वापरते. ही प्रणाली विभागनिहाय, लवचिक आणि विस्तारक्षम असून आधुनिक युद्धभूमीच्या बदलत्या गरजांना पूर्ण करते.

India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, पाहा VIDEO
Operation Sindoor : अब इस्लामाबाद का नंबर! पाकिस्तानच्या राजधानीवर मिसाइल्सचा वर्षाव, अर्धा पाकिस्तान काळोखात

काल रात्री सुद्धा जम्मू, जैसलमेर आणि इतर शहरात पाकिस्तानी लष्कर दलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र "आकाश" ने एक ही पाकिस्तानी मिसाईल खाली पाडू दिली नाही. एका बाजूला भारताकडे असणारे एस - ४०० आणि दुसऱ्या बाजूला "आकाश" या दोन्ही प्रणालीद्वारे भारतावर होणारे हल्ला रोखण्याची सुपर पॉवर भेदणे पाकिस्तानला जमणार नाही.

India-Pakistan War: भारताच्या 'आकाश'ने उधळून लावला पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, पाहा VIDEO
Operation Sindoor: मसूद अजहर ढसाढसा रडला! घराबाहेर मृतदेहांच्या रांगा; ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबातील १४ जण ठार| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com