Operation Sindoor : अब इस्लामाबाद का नंबर! पाकिस्तानच्या राजधानीवर मिसाइल्सचा वर्षाव, अर्धा पाकिस्तान काळोखात

India-Pakistan War : पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी केला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला.
India now attacks the Pakistan capital Islamabad
India now attacks the Pakistan capital Islamabad Saam Tv News
Published On

इस्लामाबाद : पाकड्यांच्या कुरापतींना भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं असून लाहोरनंतर आता थेट राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी आता इस्लामाबादवर हल्ला केल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचे आवाज येत असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं निकामी केला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करत हल्ला केला. भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेलं आहे. तसेच इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.

India now attacks the Pakistan capital Islamabad
India Pakistan War : पाकिस्तानचा हमास पॅटर्न, भारतावर नेमका कसा हल्ला केला? व्हिडीओतून आलं समोर

एकीकडे भारतीय वायूदलाने आणि लष्कराने पाकिस्तानला उत्तर दिल्यानंतर दुसरीकडे भारतीय नौदल आता आक्रमणासाठी सज्ज झालं आहे. भारतीय नौदल अरबी समुद्रात सज्ज झालं असून पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानच्या मिसाईल, ड्रोन हल्ल्याची पंतप्रधान मोदींना माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाच्या कारवाईकडे एनएसए अजित डोवाल यांचं लक्ष असून हल्ल्याची इत्यंभूत माहिती मोदींना दिली जात आहे. पाकिस्तानने भारताच्या दिशेने ८ क्षेपणास्त्र सोडली असून पाकची क्षेपणास्त्र भारतीय लष्करानं हाणून पाडली आहेत. सतवारी, सांबा, आरएस पुरा, अरनियामध्ये पाकची क्षेपणास्त्रं पाडण्यात आली आहेत. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकला चांगलाच दणका दिला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चीफ डिफेन्स स्टाफ यांनी संवाद साधला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिन्ही सेनाप्रमुखांच्या संपर्कात असल्याचं समजतंय.

India now attacks the Pakistan capital Islamabad
India-Pakistan War : पिक्चर अभी बाकी हैं ! चीनकडून भलता गवगवा, भारताने प्रतिहल्ल्यात चीनने दिलेली विमानं पाडली; पाकड्यांचे दोन पायलट्स पकडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com