India Pakistan War : पाकिस्तानचा हमास पॅटर्न, भारतावर नेमका कसा हल्ला केला? व्हिडीओतून आलं समोर

Ind Vs Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन केले आहेत. पाकिस्तान ड्रोन-मिसाईल्सने भारतावर ठिकठिकाणी हल्ले केले. हल्ल्यांना प्रत्त्युत्तर देत भारतानेही कराची, इस्लामाबाद अशा पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत.
India Pakistan War
India Pakistan WarX
Published On

जम्मूमध्ये सोमवारी रात्री भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर सायरन वाजवण्यात आले आणि संपूर्ण जम्मू परिसरात वीजपुरवठा बंद करण्यात आला. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मूच्या विविध सेक्टरमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

स्थानिकांनी सांगितले की, सुमारे ५ ते ६ मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेचे वर्णन एका प्रत्यक्षदर्शीने करताना सांगितले की, रात्रीच्या अंधारात आकाशात ड्रोन दिसल्यानंतर लगेचच अलर्ट जारी करण्यात आला. पाकिस्तानने भारतावर हमास स्टाईलने मिसाईल अटॅक केल्याचे म्हटले जात आहे.

India Pakistan War
मोठी बातमी! मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

जम्मूशिवाय कुपवाडा (काश्मीर) मध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद देत आरएसपोरा येथे पाकिस्तानी ड्रोन पाडला. याशिवाय भारताच्या एस-४०० सुदर्शन चक्र प्रणालीने पाकिस्तानच्या आठ क्षेपणास्त्रांना लक्ष्य करून नष्ट केल्याची माहिती आहे. अखनूरमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, आकाशात लालसर फुगेसारखी वस्तू उडताना दिसली आणि लगेचच मोठा स्फोट झाला. परिसरात वीज नसल्यामुळे फक्त वाहनांचे दिवेच दिसत होते. सध्या संपूर्ण परिसरात हवाई संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

India Pakistan War
Ind Vs Pak : जम्मूनंतर पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर जोरदार गोळीबार | Video

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता युद्धजन्य स्थितीत पोहोचला आहे. ६-७ मेच्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवर कारवाई केली आणि त्यांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय सैन्याने तो हल्ला यशस्वीपणे परतवून लावला.

India Pakistan War
IPL 2025 वर भारत-पाक युद्धाचं सावट, पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द; पुढे काय होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com