Pakistan's Drone Strike Thwarted by Indian Air Defence : पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. अवंतीपूरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड, भुज यासह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा डाव होता. मात्र, भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेने (Integrated Counter UAS Grid) वेळीच प्रत्युत्तर देत हा हल्ला हाणून पाडला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि लाहोरमधील रडार यंत्रणा नष्ट केली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. अमेरिका, रशियासह अनेक देशांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला. पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळावरील उड्डाणे बंद केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.