
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईमुळे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरला मोठा धक्का बसला. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा खात्मा झाला. कुटुंबातील सदस्यांचा मृत्यूमुळे मसूद अजहर ढसाढसा रडला. आता मसूदच्या घराबाहेरील फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये मसूदच्या घरामध्ये मृतदेहांची रांग लागल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे झेंडे या मृतदेहांवर ठेवण्यात आले आहेत.
ऑपरेश सिंदूरमध्ये कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर मसूद अजहरने एक पत्रक जारी केले होते. त्यामध्ये त्याने असे म्हटले होते की, 'भारताने केलेल्या हल्ल्यात मी देखील मेलो असतो तर बरं झालं असतं.' तसंच, भारत आता कुणाची दया करणार नाही, असंही त्याने म्हटले होते. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमुळे मसूदला खूप दु:ख झालं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरचा भाऊ आणि वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा असगर, रऊफ असगरच्या भावाची बायको यांचा मृत्यू झाला. रऊफ असगरचा मुलगा हुजैफा मौलाना देखील या हल्ल्यात मारला गेला. मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब मारलं गेलं. मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडे, बाजी सादियाचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झालीत. कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. मसूद हा भारतासाठी सर्वात धोकादायक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. इंडियन एअरलाइन्सच्या अपहरणाच्या आरोपाखाली मसूद अझहरला १९९९ मध्ये अटक करण्यात आली होती. पण नंतर ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली. तेव्हापासून तो पाकिस्तानात लपून बसला आहे आणि अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट तो पाकिस्तानमध्ये बसून रचत आहे. मसूद अजहरच्या नेतत्वातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतामध्ये आतापर्यंत अनेक हल्ले केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.