
नवी दिल्ली : भारताच्या सिंदूरनंतर पाकिस्तान पुरता बिथरला आहे. लाहोरमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना अमेरिकेकडून देण्यात आल्या आहेत, तसेच सुरक्षितस्थळी जाण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरुन उडणाऱ्या ९० विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्ताननं पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलानं ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा नेस्तनाभूत केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून आत्ता देण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ७ आणि ८ मे २०२५च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली एक जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि २०२१ मध्ये पाकिस्तानने आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.
दरम्यान, पाकिस्तानच्या लाहोरनंतर कराचीमध्ये साखळी स्फोट झाले आहेत. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहेत. कराचीमध्ये हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कराचीमध्ये ड्रोल हल्ला झाला आहे. ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. नागरिक इकडे तिकडे पळू लागले. पाकिस्तानी सैन्याने तात्काळ सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. कराचीमध्येच पाकिस्तानचा अणूबॉम्ब ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.