
पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ९ दहशतादी तळ नष्ट केले. या कारवाईमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतरर्गत ही मोठी कारवाई केली. ऑपरेश सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर देखील पाकिस्तामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे सूर वारंवार बदलत आहेत. काल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली. तर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना एक भारताला धमकी देत मोठं विधान केले. भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी त्यांनी दिली. 'भारताला काल रात्री केलेल्या चुकीची मोठी किंमत चुकवावी लागेल.', अशी धमकी शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा स्वीकार केला आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात ८० विमानाचा समावेश होता असे त्यांनी सांगितले. त्यांनी रात्री उशिरा केलेल्या भाषणात भारताला धमकी दिली आहे. 'रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानला माहिती आहे की कसे जोरदार प्रत्युत्तर द्यायचे.'
दरम्यान, भारताने मंगळवारी मध्यरात्री १.०५ च्या सुमारात पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. पाकिस्ताच्या आतमध्ये १०० किमी घुसून भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक केला आणि ९ दहशतवादी तळ नष्ट केले. अवघ्या २५ मिनिटांच्या या कारवाईमध्ये भारताने दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला. महत्वाचे म्हणजे या कारवाईमध्ये दहशतवादी मसूर अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला. या कारवाईमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.