Operation Sindoor : एअर स्ट्राईक झाँकी है, असली खेल बाकी है! पाकची होणार चार शकलं, भारताच्या हल्ल्याने पाक घायाळ

Operation Sindoor News : भारतानं ऑपरेशन राबवल्यानं पाकिस्तान बिथरलाय.. याच पाकिस्तानचे चार तुकडे होण्याची शक्यता आहे... मात्र त्यामागची कारणं काय आहेत? पाकचे कोणते तुकडे होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....
Operation Sindoor
Operation SindoorX
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानवर भारतानं एअर स्ट्राईक केलाय.. त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडालाय... लष्कराची हूकुमशाही, वांशिक दडपशाही, आणि एकूणच रसातळाला गेलेली आर्थिक स्थिती..यामुळे पाकिस्तान गर्तेत अडकलाय. नेतृत्वाअभावी राजकिय पटलावरही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळं आता बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, सिंध आणि पंजाब असे पाकिस्तानचे प्रांत आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत... पाकिस्तान विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे कारण पाकिस्तानी लोकांचा कल भारताच्या दिशेनं वाढलाय....

पाकिस्तानच्या कुरापतीनंतर तोडीस तोड उत्तर देण्यासाठी संपूर्ण भारत सरकारच्या पाठीशी उभा आहे.. मात्र पाकिस्तानमध्ये सरकारविरोधात आंदोलनाचा भडका उडालाय....तर बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी मंगोचर आणि कलात ही शहरं ताब्यात घेत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी रणशिंग फुंकलंय... तर सामान्य नागरिकही पाकिस्तानमध्ये राहण्यास तयार नसल्याचं बलुच नेत्यांनी म्हटलंय..

Operation Sindoor
Operation Sindoor नंतर मुलानं दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, मुस्लिम तरुणानं केला चाकू हल्ला

खरंतर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत... त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले.. आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलुच आर्मीने बंडाचं निशाण फडकवलंय...तर खैबर पख्तुनख्वातील नागरिकांना स्वातंत्र्य हवं असल्याने त्यांनी सैन्याविरोधात सशस्त्र लढा उभारलाय...मात्र कोणत्या प्रांतात विद्रोहाचा भडका का उडालाय? पाहूयात...

Operation Sindoor
Rohit Sharma चा मोठा निर्णय, कसोटी क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती, कारण...

बलुचिस्तान

बलुच लिबरेशन आर्मीचं बंड, जफर एक्सप्रेस हायजॅकमध्ये 20 जवानांची हत्या

पाककडून बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनं ओरबाडल्यानं असंतोष

ग्वादर बंदराचा फायदा न मिळाल्यानं अन्यायाची भावना

बलुचिस्तानातील 7 जिल्हे पाक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर

सिंध

राष्ट्रवादी सिंधी संघटनांकडून पाक सैन्यावर हल्ले

सिंध भागावर पाकने अन्याय केल्याचा आरोप

खैबर पख्तुनख्वा

खैबर पख्तुनख्वामध्ये शिया-सुन्नी संघर्ष टोकाला

तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटना अफगाणीस्तानमध्ये सहभागी होण्यास आग्रही

पंजाब

चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या लाभावरुन वाद

आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने स्वातंत्र्याच्या मागणीला जोर

Operation Sindoor
Operation Sindoor : ४ ड्रोन आले अन् सगळं उद्ध्वस्त झालं, पाकिस्तानी तरुणाने सांगितली ऑंखोदेखी

1971 मध्ये पाकच्या कुरापती न थांबल्याने भारताने थेट पाकिस्तानवरच घाव घालून 2 तुकडे करत बांग्लादेशला स्वतंत्र केलं.. आता पुन्हा पाकिस्तानने कागाळी केलीय.. त्यामुळे आता युद्ध भडकल्यास पाकिस्तानमध्येच अंतर्गत यादवी माजून पाकची 4 शकलं होतील हे मात्र निश्चित....

Operation Sindoor
Operation Sindoor : सगळीकडे पळापळ, पोरांना हातात घेऊन सैरावैरा; पाकिस्तानमधील हल्ल्याचे 'ते' दोन VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com