
Rohit Sharma News : भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेट फोर्ममधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी कर्णधारपदावरुन काढून टाकल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच रोहितने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली. रोहितने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्व चाहते नाराज झाले आहेत.
आयपीएल संपल्यानंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जून महिन्यात भारत वि. इंग्लंड अशी ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेमध्ये रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपद नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच धर्तीवर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे.
रोहित शर्माने त्याची कसोटी क्रिकेटमधल्या कॅपसोबत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर त्याने 'सर्वांना नमस्कार, मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन', असे म्हटले.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाने दोन कसोटी मालिका गमावल्या होत्या. न्यूझीलंडने भारताचा घरात ०-३ ने पराभव केला होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकाही भारताने गमावली होती. रोहितचा कसोटी फॉरमॅटमध्ये खराब फॉर्म सुरु होता. तेव्हा भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत रोहितकडे कर्णधारपद नको अशा चर्चा सुरु होत्या.
रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी फलंदाजांपैकी एक होता. त्याने ६९ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांच्या मदतीने ४३०१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताच्या कसोटी संघाची जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.