
इस्लामाबाद : भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचं ९ तळ नष्ट केलं. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब मारलं गेल्याची माहिती समोर आली आहे. मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला आहे. याचदरम्यान, दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, 'भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. तसेच, भारत आता कुणाची दया करणार नाही', असंही मसूदनं म्हटलं आहे.
जैश-ए-मोहम्मदनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, 'मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब मारलं गेलंय. मुफ्ती अब्दुल रौफ यांची नातवंडे, बाजी सादियाचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झालीत. कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर आज बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मसूद अझहरनं पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
अल्लाह तहलाचे काही खास लोक असतात, जे शहीद होतात, ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली. रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे या अपघातात शहीद झाले.
माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा, आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं. एका अनुभवी माणसाने सांगितलंय की, 'हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्यांचा मृत्यू अचानक झाला पण त्यांच्या नशिबात हे लिहिलं होतं. त्यांचं शहिद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्यांना आपले पाहुणे बनवले'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.