Operation Sindoor: २५ मिनिटांत २१ ठिकाणी हल्ले..., भारतीय लष्कराने सांगितला ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम

Indian Army Press Conference On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Operation Sindoor: २५ मिनिटांत २१ ठिकाणी हल्ले..., भारतीय लष्कराने सांगितला ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम
Indian Army Press Conference On Operation SindoorSaam Tv
Published On

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला धडा शिकवला. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये १०० किमी आतमध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. या एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. त्याचसोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली.

लष्कराची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी भारतावर दहशतवाद्यांनी आतापर्यंत केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ दाखवण्यात आले. यामध्ये ऊरी हल्ला, २६/११ हल्ला, पहलगाम हल्ला हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये एका दशकात दहशतवादी हल्ल्यामध्ये ३५० भारतीयांचा मृत्यू झाला असे सांगितले.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावेळी सांगितले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ला क्रूर होता. दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर गोळ्या घातून हत्या केली. हल्लेखोर लष्कर ए-तोएबाशी संबंधित होते. हल्ल्यानंतर त्यांना माहिती देण्यास सांगण्यात आले. हल्लेखोरांचे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले. पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहे. तो दहशतवाद्यांबद्दल खोटे बोलतो.'

Operation Sindoor: २५ मिनिटांत २१ ठिकाणी हल्ले..., भारतीय लष्कराने सांगितला ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम
Operation Sindoor: त्यांनी आमचं कुंकू पुसलं, 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव योग्य; पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

परराष्ट्र सचिव यांनी पुढे सांगितले की, आज भारताने आपला अधिकार बजावला आहे. आम्ही मोजपान करत कारवाी केली. आम्ही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला. दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. आम्ही फक्त पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य केले. पाकिस्तानी लष्कराच्या तळावर हल्ले केले नाहीत.'

तसंच, कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितल्या. त्या म्हणाल्या की, 'पाकिस्तानवर पहाटे १.०५ वाजता हल्ला झाला. या कारवाईत ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले. ही कारवाई मध्यरात्री १.०५ ते १.३० वाजेपर्यंत चालली. गुप्तचर माहितीच्या आधारे दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. दहशतवादी हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांवर हा हल्ला केला.'

Operation Sindoor: २५ मिनिटांत २१ ठिकाणी हल्ले..., भारतीय लष्कराने सांगितला ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर 'असे' पडले मिसाईल्स! भारताच्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

सोफिया कुरेशी पुढे म्हणाल्या की, 'पाकिस्तान आणि पीओके दोन्हीवर हल्ले झाले. आम्ही नागरिकांना इजा पोहचवली नाही. आम्ही जैश आणि लष्करच्या छावण्यांना लक्ष्य केले. ९ ठिकाणी २१ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण सियालकोट आहे. येथील सरजल छावणीवर हल्ला झाला. इथे हिजबुलची एक छावणी होती.'

Operation Sindoor: २५ मिनिटांत २१ ठिकाणी हल्ले..., भारतीय लष्कराने सांगितला ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर 'असे' पडले मिसाईल्स! भारताच्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com