
Operation Sindoor Air Strike: 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. भारताने मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ तळांवर हल्ला केला आहे. पीओकेपासून बहावलपूरपर्यंत स्फोट झाले आहेत. दरम्यान, भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या या एअर स्ट्राईकचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अशाच एका व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी लोकं कारमधून प्रवास करताना दिसतायत. अचानक त्यांच्या समोरील रस्त्यावर एक मिसाईल पडताना या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. आणि काही क्षणातच त्या ठिकाणी धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे. ज्या कारमधून व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला त्या कारमधील लोक अचानक घडलेल्या आणि धक्कादायक घटनेवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर ७ ते २० सेकंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतायत. बहावलपूरपासून मुस्तफाबादपर्यंत दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले करण्यात आले आहेत. भारतीय सैन्याची ही कारवाई रात्री १.३० च्या सुमारास करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये करण्यात आले आहेत.
सीमेवरून एक अपडेट आली असून यामध्ये भारतीय हवाई दलाने हवाई गस्त वाढवल्याचं समोर आलं आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी सुविधांना कोणत्याही प्रकारचं नुकसान करण्यात आलेलं नाही. या कारवाईचा मुख्य उद्देश दहशतवादाचा नायनाट करणं आहे. तसंच शेजारी देशासोबतचा संघर्ष वाढवू नये याची खात्री करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.