Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?

Pahalgam Attack: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानात १०० किमी आतमध्ये घुसून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. कोणकोणत्या ९ ठिकाणी भारताने पाकिस्तानात हल्ला केला ते घ्या जाणून...
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?
Operation SindoorSaam Tv
Published On

भारताच्या बलाढ्य सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सशस्त्र दलाने मध्यरात्री १.३० वाजता पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पीएम मोदी यांच्या सूचनांनुसार ही कारवाई रण्यात आली आहे. पाकिस्तानातील डझनभर दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवून हा हल्ला करण्यात आला आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यालाला भारतीय सैन्याने हे प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. याचाच बदला म्हणून भारतीय सैन्यांनी पाकिस्तानच्या सीमेपासून १०० किमी आतमध्ये घुसून दहशतवाद्यांची ठिकाणं लक्ष्य केली. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत राफेल विमानांनी लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केली.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?
Operation Sindoor: पाकिस्तानची नजर मॉक ड्रिलवर; भारताने रात्री दीड वाजता केला एअर स्ट्राईक, जाणून घ्या सर्व माहिती

भारतीय हवाई दलाने राफेल लढाऊ विमानांचा वापर करून मरकझ-ए-तैयबा आणि जैश-सुभानअल्लाहच्या तळांवर अचूक हवाई हल्ले केले. मुंबईवर २६/११ चा हल्ला करणारे दहशतवादी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील बहावलपूर, कोटली, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट आणि मुरीदके येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?
Operation Sindoor: धर्म विचारून मारलं, थेट मस्जिद उडवली... भारताचं सडेतोड उत्तर

सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट स्ट्राईकनंतर, ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी संयुक्तपणे पाकिस्तानच्या घुसून हल्ला केला आणि दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्याचा आणखी एक जबरदस्त संदेश दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. पण भारताने तो दावा फेटाळला आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे होता, पाकिस्तानचे लष्करी तळ उद्ध्वस्त करणे हा नव्हता.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पहिल्यांदाच राफेल लढाऊ विमानांचा वापर करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले आहेत. हे पाऊल भारताच्या लष्करी इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. राफेलची तांत्रिक ताकद आणि त्याची अचूकता यामुळे भारतीय हवाई दलाला एक नवीन आयाम मिळाला आहे आणि ऑपरेशन्स अत्यंत प्रभावी झाले आहे.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर 'असे' पडले मिसाईल्स! भारताच्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com