Hania Aamir Post: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानमधील अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन केले. यामध्ये अभिनेत्री हानिया आमिर यांचाही समावेश होता. यामुळे, सोशल मीडियावर हानिया आमिर यांच्या नावाने एक खोटं विधान व्हायरल झालं, यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम बॅन करू नका अशी विनंती करण्यात आली होती.
या खोट्या विधानामुळे, हानिया आमिरने तिच्या इंस्टाग्रामवरून स्पष्टीकरण दिलं. हनियाने स्पष्ट केलं की, "अलीकडेच माझ्या नावाने एक विधान सोशल मीडियावर पसरवलं जात आहे. हे विधान पूर्णपणे खोटं असून, माझ्याशी याचा काहीही संबंध नाही." तिने पुढे म्हटलं की, "सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील आणि भावनिक आहे. अशा वेळी, कोणत्याही प्रकारचं खोटं विधान प्रसारित करणं चुकीचं आहे."
हानिया आमिरने आपल्या पोस्टमध्ये असंही नमूद केलं की, "दहशतवादी हल्ल्यांमुळे संपूर्ण देशाला दोषी ठरवणं योग्य नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणं केवळ दोन देशांमधील दरी वाढवण्याचं काम करतं." तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं की, "कृपया कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा आणि या कठीण काळात सहानुभूती आणि स्पष्टतेने वागा."
भारत सरकारने हानिया आमिर, माहिरा खान, अली झफर, सानम सईद, बिलाल अब्बास, मोमिना मुस्तेहसन, इक़रा अज़ीज, इमरान अब्बास आणि सजल अली यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट्स भारतात बॅन केले आहेत. इंस्टाग्रामवर या अकाउंट्सवर "Account not available in India" असे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.