Raid 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या 'रेड 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाने 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 18.25 कोटींची कमाई केली असून, यामुळे तो 2025 मधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.
'रेड 2' हा 2018 मध्ये आलेल्या 'रेड' या सुपरहिट चित्रपटाची सिक्वेल आहे. या भागात अजय देवगणने पुन्हा एकदा आयकर विभागाच्या अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रितेश देशमुखने दादा मनोहर भाई या खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर वाणी कपूरने अमय पटनायकच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सुट्टी असल्याने, 'रेड 2' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळच्या शोमध्ये 21.23% उपस्थिती नोंदवली गेली, तर, संध्याकाळच्या शोमध्ये 38.45% पर्यंत वाढली. या चित्रपटाने अजय देवगणच्या 'दृश्यम 2' च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत त्याच्या अन्य जास्त कमाई करणाऱ्या ९ चित्रपटांना मागे टाकले आहे.
'रेड 2'ने पहिल्या दिवसाच्या कमाई बाबद 'केसरी 2', 'जाट 2', 'ग्राउंड झीरो' आणि 'अंदाज अपना अपना' या चित्रपटांना मागे टाकले आहे. येत्या आगामी आठवड्यातही हा चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे कथानक, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.