पाकिस्तानसोबत तणाव वाढलेला असतानाच भारताचा मोठा निर्णय
PM Narendra Modi MeetingPTI

India-Pakistan Conflict : भारताचा सर्वात मोठा निर्णय; आता दहशतवादी हल्ला झाला तर...

India-Pakistan Conflict latest Update : पाकिस्तानसोबत तणाव वाढला असतानाच, भारत सरकारनं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर, त्याला युद्ध मानलं जाईल आणि त्याच पद्धतीने भारत त्याला प्रत्युत्तर देईल.
Published on

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भारतावर ड्रोन हल्ले केले जात आहेत. भारताकडून त्याला दमदार प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले जात आहेत. हा संघर्ष वाढलेला असतानाच, भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. आता जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर, त्याला युद्ध समजले जाईल आणि त्याला त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी सरकारनं भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले सुरूच राहिले तर आता अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला तितक्याच ताकदीने उत्तर दिले जाईल, असं भारतानं घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. पाकिस्तानकडून आणखी हल्ले होत राहिल्यास ते युद्ध मानले जाईल आणि त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचे दिसते.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. या हल्ल्याच्या घटनेमुळं देशभरात संतापाची लाट उसळली होती. हा हल्ला पाकिस्तानस्थित लश्कर ए तोयबाच्या टीआरएफ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा संशय होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं ऑपरेशन सिंदूरने सडेतोड उत्तर दिले.

पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यात जैशच्या मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य देखील मारले गेले. याशिवाय इतर दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरसह शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. मात्र, त्यांना पोसणारा पाकिस्तान बिथरला. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून जम्मूसह इतर शहरांमध्ये ड्रोन हल्ले सुरू केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हवेतच या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत ड्रोन नष्ट केले.

पाकिस्तानसोबत तणाव वाढलेला असतानाच भारताचा मोठा निर्णय
India Pakistan tensions: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक| VIDEO

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा भारतातील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. पण भारतीय लष्करानं ते हल्ले देखील परतवून लावले. भारताच्या सैन्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताने तोडीस तोड उत्तर देत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. भारताने काल, शनिवारी रात्री पाकिस्तानचे सहा हवाई तळ उद्ध्वस्त केले.

पाकिस्तानसोबत तणाव वाढलेला असतानाच भारताचा मोठा निर्णय
India-Pakistan: आम्ही माघार घ्यायला तयार, भारताच्या उत्तरानं थरथरणारा पाकिस्तान आता करतोय गयावया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com