Ind vs Pak : पाकिस्तानला मोठा फटका, भारताशी पंगा घेतल्याने पाकड्यांचे १२४० कोटींचे नुकसान

India vs Pakistan War : ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल १२४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
pakistan prime minister
pakistan prime ministerx
Published On
Summary
  • भारताशी पंगा घेतल्याचा पाकिस्तानला फटका

  • पाकिस्तानचे १२४० कोटी रुपयांचे नुकसान

  • पाकिस्तानी वृत्तपत्रांनी ही माहिती समोर आणली

Ind vs Pak War : पहलगाम हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिले. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांमधील तणाव ताणले गेले. यादरम्यान पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांना १२४० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एकूणच पाकिस्तानने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांनी हे आकडे समोर आणत पाकिस्तानला झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे.

काश्मीरमधील पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने कठोर निर्बंध लावले. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यात आला. भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना बंदी घालण्यात आली. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानचा १२४० कोटींचे नुकसान झाले आहे.

pakistan prime minister
Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

भारताच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा काय परिणाम झाला याची माहिती पाकिस्तानच्या संसदेमध्ये देण्यात आली. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने दररोज १०० पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे प्रभावित होत आहेत. याचा आर्थिक फटका पाकिस्तानला बसला आहे. २४ एप्रिल ते ३० जून या कालावधीत पाकिस्तानला १२४० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

pakistan prime minister
Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

याआधीही पाकिस्तानने अनेकदा त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. पाकिस्तानने आमचे नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी एअरपोर्ट अथॉरिटीच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून जाणाऱ्या विमानांमुळे त्यांची दररोज ४.२४ कोटींची कमाई व्हायची. आता २०२५ मध्ये कमाईमध्ये ६.३२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

pakistan prime minister
Manoj Jarange Patil : मराठे हिंदू नाहीत का? जातच संपली, तर धर्म कसा टिकवायचा? जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com