Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग

IAF Wing Commander Arrested: वायु दलाच्या विंग कमांडरला वॉर प्लान लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी एजंटला तसल्या फोटोच्या बदल्यात त्याने वॉर प्लानची माहिती दिली.
Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग
IAF Wing Commander Saam Tv
Published On: 

भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरने देशविरोधी कृत्य केले. त्याने पाकिस्ताने गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका एजंटला संवेदनशील लष्करी माहिती आणि वॉर प्लानची माहिती लीक केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर हवाई दलात खळबळ उडाली आहे. या विंग कमांडरने ही गुप्त माहिती नग्न फोटोच्या बदल्यात दिली असल्याचे उघड झाले. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून पोलिसांनी दाकल केलेल्या आरोपपत्राने संपूर्ण हनीट्रॅप नेटवर्क उघड केले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शासकीय गुप्तता कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणामध्ये आरोपी विंग कमांडर गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. या अधिकाऱ्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, अशाप्रकारची संवेदनशील माहितीच्या लीक झाल्यामुळे देशाच्या लष्करी सज्जतेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता.

Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग
Mumbai Crime: मुंबई हादरली! १० जणांकडून नवरा-बायको अन् मुलीवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् काठ्यांनी मारहाण

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, विंग कमांडर १२ जानेवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीदरम्यान व्हॉट्सअपद्वारे पाकिस्तानी एजंटशी सतत संपर्कांत होता. १ एप्रिल रोजी जेव्हा हा अधिकारी आपल्या कार्यालयात स्मार्टफोन घेऊन जात होता तेव्हा संशय म्हणून त्याला रोखण्यात आले आणि त्याची तपासणी केली. तेव्हा हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

विंग कमांडरच्या स्मार्टफोनची तपासणी केली असता त्यामुळे पाकिस्तानी एजंटने त्याला न्यूड फोटो पाठवल्याचे दिसून आले. या फोटोच्या बदल्यात हा अधिकारी वायू दलाशी संबंधित सिक्रेट प्लानचे एक पान शेअर केले होते. पोलिसांनी आरोप केला की, आरोपी अधिकाऱ्याने स्वत: ही ऑफर दिली होती की त्याला मिळणाऱ्या प्रत्येक न्यूड फोटोच्या बदल्यात तो त्याला युद्ध योजनेच्या कागदपत्रांचे एक पान पाठवत राहिल.

Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग
Mumbai Local Crime : मुंबई लोकलमध्ये संतापजनक घटना! तरुणीचा विनयभंग करून ट्रेनखाली ढकललं | VIDEO

आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपीने भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या सामरिक तयारीसंदर्भात अत्यंत गोपनीय माहिती एका पाकिस्तानी एजंटला पुरवली. त्याने हवाई दलाच्या एका गुप्त ड्रोन युनिटची संख्या, त्यांच्या लढाऊ विमानांची तैनाती, कारवाया, ड्रोन चाचण्या, उड्डाण क्षमता आणि शस्त्र लक्ष्यीकरण प्रणाली यांविषयी माहिती दिली. युद्धाच्या परिस्थितीत ड्रोन युनिटच्या संभाव्य तैनाती ठिकाणांविषयीची माहितीही त्याने पुरवली असल्याचे तपासातून उघड झाले.

Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग
Kalyan Crime : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

आरोपीने लेहमध्ये लढाऊ विमानांच्या तैनातीची आणि राजस्थानमधील सुरतगड येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये झालेल्या लष्करी सरावाची माहिती देखील लीक केली होती. आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी त्या दोघांमधील डिजिटल संवादाचे ठोस पुरावे सादर केले आहेत. व्हॉट्सॲप डेटाच्या तपासणीत त्यांच्यामध्ये ३,००८ टेक्स्ट मेसेजेस, ६५ न्यूड फोटो, ६५ रिॲक्शन्स, ४२ व्हॉइस कॉल्स, ४ व्हिडिओ कॉल्स आणि ६ संशयास्पद यूआरएलची देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले.

Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग
Jalna Crime News: शेतात सोन्याने भरलेले सात हंडे! कुंकू, लिंबू, नारळ सोन्यासाठी शेतात अघोरी पुजा; जालन्यातील धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.