चक्रीवादळाचं रौद्ररुप!150किमीच्या वेगानं किनारपट्टीवर धडकणार; दिल्ली ते पश्चिम बंगालमध्ये होणार मुसळधार पाऊस

Cyclone Warning Heavy Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील अर्नब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने जोरदार वारे आणि अतिवृष्टीचा इशारा दिलाय.
Cyclone Warning Heavy Rain Forecast :
Cyclone Arnab Alert: IMD Warns Of Strong Winds And Heavy Rainsaam tv
Published On: 
Summary
  • आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

  • ओडिशातील काही भागांत जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा

  • पश्चिम बंगालमध्येही काही भागांत पाऊस आणि वादळी हवामानाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'अर्नब' हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालंय. आता या चक्रीवादळानं रौद्ररूप धारण केलंय. हे वादळ बुधवारी दुपारपूर्वी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. ज्यावेळी हे वादळ किनारपट्टीला धडकेल त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत राहू शकतो. यामुळे भारतीय हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केलाय.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'अर्नब' या अत्यंत तीव्र चक्रीवादळामुळे २७-२८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि ओडिशामधील काही भागांत, तर २८ ऑक्टोबर (बुधवार) रोजी छत्तीसगडच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार चक्रीवादळ जमिनीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी असेन.

वाऱ्याचे झोत ताशी १५० किमीपर्यंत वाहू शकतात. हवामान विभागाने सांगितले की, सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी २२ किमी वेगाने पश्चिमेकडे सरकलंय

चक्रीवादळ 'अर्णब' सध्या कुठेपर्यंत पोहोचलंय?

हे चक्रीवादळ सध्या विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) पासून आग्नेयेकडे सुमारे २२० किमी, काकीनाडा (आंध्र प्रदेश) पासून पूर्व-आग्नेयेकडे २४० किमी, गोपालपूर (ओडिशा) पासून दक्षिणेकडे ३७० किमी, मछलीपट्टणम (आंध्र प्रदेश) पासून पूर्वेकडे ३४० किमी, बापटला (आंध्र प्रदेश) पासून पूर्वेकडे ४१० किमी आणि श्री विजय पुरम (अंदमान बेटे) पासून पश्चिम-वायव्य दिशेला ९३० किमी अंतरावर केंद्रित आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, हे २७ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल. त्यानंतर उत्तर-पश्चिम दिशेला वळून बापटला व विशाखापट्टणमच्या दरम्यान यानमजवळ किनारपट्टी ओलांडेल, अशी शक्यता आहे.

Cyclone Warning Heavy Rain Forecast :
Weather Update: 70 kmच्या वेगानं वाहणार सोसाट्याचा वारा, होणार धुव्वाधार पाऊस; 13 राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ बापटला आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान, यानमजवळ धडकेल. किनारपट्टी ओलांडताना हे वादळ 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ' स्वरूपाचे असेल. यावेळी वाऱ्याचा वेग ११५ ते १२५ किमी/तास असेल आणि वाऱ्याचे झोत १५० किमीवेगापर्यंत पोहोचू शकतात.

Cyclone Warning Heavy Rain Forecast :
140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीच्या भागांत आणि मध्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममधील काही निवडक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. साधरण २०४.४ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

यासह ओडिशामधील अनेक भागांत २७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तसेच २८ ऑक्टोबर रोजी ६० ते ७० किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमधील काही निवडक ठिकाणीही २८ ऑक्टोबर रोजी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय.

या राज्यांसह हवामान विभागाने २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारमधील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. यासोबतच ५० ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झारखंडसाठी २९ ऑक्टोबरकरिता 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आलाय. तिथे एनडीआरएफची (NDRF) एक टीम तैनात करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com