

हवामान विभागाचा १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
७० किमी प्रतितास वेगाने वारे आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज
तामिळनाडू आणि केरळमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झालाय. यामुळे पुढील दोन आठवड्यांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. देशातील किमान १३ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या काही भागांतही पाऊस पडू शकतो.
देशाच्या दक्षिण भागातही जोरदार पाऊस पडेल, तर उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच केरळमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आहे. यासह लक्षद्वीप, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ईशान्य भारत आणि अंदमान व निकोबार बेटांसह अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती आणि लगतच्या आग्नेय भागात वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी असू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी ७० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसाठी पावसाबाबत कोणताही विशेष हवामान इशारा देण्यात आलेला नाही.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या दिवशी पश्चिम किंवा पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कोणताही इशारा नाही. मात्र, आगामी दिवसांत हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात. २८ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही पावसाबाबत कोणताही विशेष हवामान इशारा देण्यात आला नाहीये. हवामान विभागाने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जातेय.
२८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक भागांत पाऊस पडू शकतो. २७ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मेघगर्जनेसह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास असू शकतो.
रविवारी दिल्लीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक असू शकते. दुसरीकडे, कमाल तापमान अनेक भागांत सामान्यच्या आसपास, तर काही ठिकाणी सामान्यपेक्षा थोडे अधिक राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी ईशान्य दिशेकडून १२ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
दिल्लीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक असू शकते. पूर्व राजस्थानच्या काही भागांत हलका पाऊस पडू शकतो. या दिवशी पश्चिम राजस्थानमध्ये पावसाची शक्यता नगण्य आहे. हवामान विभागाने २४ ऑक्टोबर रोजी पूर्व आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागांत जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जनेची शक्यता वर्तवली होती; मात्र, हा इशारा २५ ऑक्टोबरसाठी लागू नाही.
महाराष्ट्रातही पाऊस परतणार आहे. २७, २८, २९ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.