Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

IMD Weather Alert : तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, ओडिशा आणि महाराष्ट्रासह काही राज्यांत पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
IMD rain alert for nine states on October 20 2026
IMD rain alert for nine states on October 20 2026saam tv
Published On: 
Summary
  • पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटांवरही पावसाची शक्यता

  • तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये वादळी पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज

  • महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असतानाच काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस होत आहे. याच दरम्यान महाराष्ट्रासह ९ राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. उद्या म्हणजेच मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी देशातील ९ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि ओडिशासह महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यासह पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटांवरही पाऊस पडू शकतो. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये वादळी पावसासोबत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, ज्यांचा वेग ६० किमी प्रतितास इतकाही वाढेल असा अंदाज आहे.

IMD rain alert for nine states on October 20 2026
IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

ओडिशा आणि अंदमान व निकोबार बेटांवर वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत पोहोचू शकतो, यासह दक्षिण भारतातील काही भागांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान

मंगळवारी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा घाटमाथा, सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. यासह बुधवार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत गडगडाटासह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

IMD rain alert for nine states on October 20 2026
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मंगळवारी उत्तर प्रदेशसाठी पावसाबाबत कोणतीही विशेष चेतावणी जारी करण्यात आलेली नाहीये. भारतीय हवामान विभागानुसार या आठवड्यात वायव्य भारतात हवामानात कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत. उत्तर प्रदेशसाठी पाऊस किंवा वादळाबाबत कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

भारतीय हवामान विभागाने बिहारमध्ये पावसाबाबत कोणतीही विशेष चेतावणी दिलेली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण आठवड्याभरात पूर्व भारतात हवामानात कोणतेही मोठे बदल होणार नसल्याचं म्हटलंय. याचा अर्थ असा की, बिहारसाठी मुसळधार पाऊस, वादळ किंवा जोरदार वाऱ्यांबाबत कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठे बदल किंवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाहीये.

दिल्लीतील हवामानही निरभ्र राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजधानीतील कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दोन्ही तापमाने सामान्य श्रेणीच्या आसपास राहतील असा अंदाज आहे. सकाळच्या वेळी वायव्य दिशेकडून १५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com