140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

Cyclone Arnab, IMD Warns: 'अर्नब' नावाचे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये मोठी विध्वंस घडवून आणू शकतो. राज्य सरकारांनी आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केलीय.
latest news
Cyclone Arnab expected landfall in Andhra Pradesh on October 28saam tv
Published On: 
Summary
  • अर्णब चक्रीवादळाबाबत हवामान विभागाचा ताजा अंदाज

  • बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

  • २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज

पुद्दुचेरीजवळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून अर्नब' नावाच्या भीषण चक्रीवादळात रूपांतरित झालंय. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झालीय. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुद्दुचेरीमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून जोरदार वारे वाहत आहेत.

latest news
Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरीसह दक्षिण भारतातील सर्व राज्यांसाठी इशारा जारी केलाय. दरम्यान, राज्य सरकारांनी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केलीय. किनारपट्टीवरील भागांतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिलेत. तसेच, नागरिकांना अधिक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. गरज पडल्यास तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 'अर्नब' नावाचे चक्रीवादळ २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर समुद्रात उंच लाटा उसळू शकतात.

२४ ऑक्टोबर रोजी, पूर्व-मध्य आणि त्याला लागून असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले. त्याचे रूपांतर 'डिप्रेसन'मध्ये म्हणजेच कमी दाबाच्या प्रणालीत झाले आणि ते अंदमान बेटांवरील श्री विजयपुरमच्या वायव्य दिशेला ५१० किलोमीटर अंतरावर पोहोचले.

latest news
Weather Update: 70 kmच्या वेगानं वाहणार सोसाट्याचा वारा, होणार धुव्वाधार पाऊस; 13 राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण दिशेला सरकेल आणि अधिक तीव्र होऊन 'खोल कमी दाबाचे क्षेत्र' बनेल. २५ ऑक्टोबरपर्यंत, हे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि आग्नेय भागातून पश्चिम-वायव्य दिशेला प्रवास करेल. २६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. २७ ऑक्टोबरच्या सकाळी बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात पोहोचल्यावर हे अधिक तीव्र होऊन 'गंभीर चक्रीवादळ' बनेल. त्यानंतर, २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचेल. या काळात समुद्र रौद्र रुप घेईल.

बापटला आणि विशाखापट्टणममध्ये होईल लँडफॉल

भारतीय हवामान विभागानुसार चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि यमनच्या किनारपट्टीवरील बापटला आणि विखाशपट्टनमच्या दरम्यान लँडफॉल करेल. परिणामी ताशी ११५ ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मुसळधार पाऊस पडेल आणि समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे सखल भागात पूर येण्याचा धोका निर्माण होईल. अशा परिस्थितीत मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते.

या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील पिके, घरे, रस्ते आणि विजेचे खांब उळमळून कोसळू शकतात. दक्षिण ओडिश्याच्या किनारपट्टीच्या भागांत चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवेल. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, काकीनाडा, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि गुंटूर हे किनारपट्टीचे जिल्हे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मदत छावण्या उभारण्यात आल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अतिवेगवान वाऱ्यांमुळे या भागांतील घरांचे नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com