रात्री मित्रासोबत फोनवर बोलणं, सकाळी खोलीत २० वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह; शासकीय वसतिगृहात नेमकं काय घडलं?

Student Found Dead : नंदुरबारच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात २० वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूची माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप करत पालकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
20-year-old nursing student found dead in Nandurbar government girls hostel
20-year-old nursing student found dead in Nandurbar government girls hostelsaam tv
Published On: 
Summary
  • शासकीय मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक घटना घडली.

  • नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह खोलीत आढळला.

  • दोघांमध्ये फोनवर वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

नंदुरबारमधील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने खळबळ उडालीय. सुरेखा पावरा असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान मृत्यूची माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप करत पालकांनी वसतिगृह प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय.

20-year-old nursing student found dead in Nandurbar government girls hostel
पुण्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्यांचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आश्रमशाळेतील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता मुलीच्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय.नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग परिसरात आदिवासी विकास विभागाचे शासकीय मुलींचे वसतिगृह आहे. याच वसतिगृहात सुरेखाचा मृतदेह तिच्या खोलीत आढळून आला. घटनेच्या आदल्या रात्री सुरेखा एका मित्रासोबत पहाटे तीन वाजेपर्यंत फोनवर बोलत होती.

20-year-old nursing student found dead in Nandurbar government girls hostel
Navi Mumbai: पाण्यात पसरलं हायव्होल्टेज करंट; विजेचा धक्का लागून २ कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी, नवी मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

यादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित तरुण वसतिगृहात आला असता सुरेखा खोलीत मृतावस्थेत आढळली. सकाळी सुमारे दहा वाजता सुरेखाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्याचे सांगण्यात आली. मात्र, वसतिगृह प्रशासनाकडून पालकांना दुपारी बारा वाजता माहिती देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. घटनेची माहिती देण्यास विलंब का झाला, असा सवाल उपस्थित करत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा, प्रशासनाची जबाबदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत माहिती देण्याची व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. सुरेखाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणाचा तपास आणि अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

याप्रकरणी शिवसेना शिंदे गट आमदार आमश्या पाडवी यांनी वसतीगृहाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय. मृत विद्यार्थिनी माझ्या मतदारसंघातील आहे. वसतीगृहाच्या वार्डनला याबाबत विचारणा करण्यात आली तर त्यांनी फोनवरील मुलगा मुलीच्या ओळखीचा असून तो भाऊ असल्याचं सांगण्यात आलंय. त्याची नोंद वहीतही त्याचा उल्लेख भाऊ म्हणून करण्यात आलाय. तोच आरोपी असल्याच म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.