Kalyan Crime : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

latest Kalyan crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे नाटक करत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या विवाहा नंतरही छळ सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
latest crime updates in Kalyan and Thane district
latest crime updates in Kalyan and Thane districtsaam tv
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले, बौद्ध पद्धतीने लग्न केल्याचे नाटक केले आणि त्यानंतर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतरही पीडित तरुणीचा छळ आणि तिला धमक्या देण्याचे प्रकार सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल गायकवाड याला अटक केली असून, त्याच्यासह कुटुंबातील एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुजल गायकवाड याने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे भासवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असा आरोप पिडितेकडून करण्यात आला आहे.

latest crime updates in Kalyan and Thane district
Shocking : नागपूर हादरले! कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण आले समोर

दरम्यान, आरोपीने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतरही पीडितेचा मानसिक छळ सुरूच ठेवला. तसेच तिला वारंवार धमक्या दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

पीडितेच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल गायकवाडसह त्याच्या कुटुंबातील एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुजल गायकवाड याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

latest crime updates in Kalyan and Thane district
Bribe Case : बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात; नागपूरमध्ये खळबळ

मात्र, या प्रकरणातील इतर नातेवाईकांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे संबंधितांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कल्याणचे महात्मा फुले पोलीस करत आहेत. दरम्यान, पीडितेने केलेल्या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.