Bribe Case : बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात; नागपूरमध्ये खळबळ

Nagpur Municipal Corporation Bribe Case News : नागपूर महानगरपालिकेतील टॅक्स कलेक्टर गौरव वानखेडे याला जमाबंदी रेकॉर्डची माहिती देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.
Nagpur Bribe Case News
Nagpur Bribe Case News AI image
Published On: 
Summary
  • नागपूर महानगरपालिकेतील लाचखोरीचा प्रकार एसीबीच्या कारवाईतून उघड

  • टॅक्स कलेक्टर गौरव राजू वानखेडे याच्यावर एक हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

  • आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार

नागरिकांना शासकीय कामासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, काही कर्मचारी काम करून देण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करतात. असाच एक प्रकार नागपूर महानगरपालिकेत समोर आला असून, जमाबंदी रेकॉर्डची माहिती देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडले आहे. गौरव राजू वानखेडे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो नागपूर महानगरपालिकेत टॅक्स कलेक्टर म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर असलेल्या घराचा जमाबंदी रेकॉर्ड मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने महापालिकेकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी टॅक्स कलेक्टर गौरव वानखेडे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली.

Nagpur Bribe Case News
Hair Fall : विशीतच केस पांढरे होताहेत? आजच करा 'हे' उपाय; महिनाभरात दिसेल चमत्कार

सरकारी कामासाठी पैसे देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतली. १२ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने पुढील कारवाई सुरू केली. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी पंचांच्या उपस्थितीत लाच मागितल्याची पडताळणी करण्यात आली.

Nagpur Bribe Case News
Sanjay Shirsat : मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला; ३ तरुण पोलिसांच्या ताब्यात; पाहा Video

यावेळी वानखेडे याने एक हजार रुपये स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारताच पथकाने तातडीने कारवाई केली आणि गौरव वानखेडे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे नागपूर महानगरपालिकेतील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, सरकारी कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.