Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Iran-America War: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या फटका भारताला बसत आहे. त्यामुळे भारत सरकारने बांधकामावर बंदी घातल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय ते घ्या जाणून....
Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Construction BanSaam Tv
Published On
  • भारतात २ वर्षे बांधकाम बंदी असल्याचा मेसेज व्हायरल

  • व्हायरल मेसेजमागचं सत्य काय हे आपण जाणून घेणार आहोत

  • नीती आयोगाने बांधकाम बंदी घातली हे खरं आहे का?

  • भारतातील बांधकाम व्यवसायावर संकटात

संदीप चव्हाण, साम टीव्ही

आता दावा करण्यात आलाय की देशात बांधकामांवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आलीय. पण, खरंच असा सरकारने निर्णय घेतलाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

आखाती राष्ट्रातील युद्धाचा फटका आता भारतालाही बसू लागलाय. संपूर्ण भारतात 2 वर्षांसाठी बांधकामावर बंदी घालण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. नीती आयोगाने बांधकाम करण्यावर बंदी घातल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच युद्धाचा फटका बांधकाम व्यवसायाला बसलाय का? खरंच एवढा मोठा निर्णय का घेण्यात आलाय? युद्धाचा फटका भारताला बसतोय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार

पश्चिम आशियातील संकटामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येतोय. त्यामुळे नीती आयोगाने संपूर्ण भारतात दोन वर्षांच्या बांधकाम बंदीची मागणी केलीय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण, देशात कंन्ट्रक्शन व्यवसाय हा खूप मोठा आहे. मोठमोठ्या बिल्डिंगची कामं सुरू आहेत. तर काही जणांच्या घरांचं काम सुरू आहे.

Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Iran-America War: इराण-अमेरिकेचं युद्ध १० दिवसांसाठी थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती | VIDEO

मग बांधकाम सुरू असलेल्या घरांचंही काम थांबवणार का? असा निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. बांधकाम साहित्यही मिळणार नाही का? असे प्रश्न उपस्थित झाल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने सरकारकडून माहिती मिळवली. त्यावेळी सरकारच्या अधिकृत पीआयबी पेजवर काय माहिती देण्यात आली पाहुयात...

Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
पाकिस्तानला झटका; होर्मुझमध्ये अमेरिकेनं पाकला दाखवली जागा, नेमकं काय घडलं? video

साम इन्व्हिस्टिगेशनमधून समोर आले की, नीती आयोगाने बांधकामांवर बंदी घातलेली नाही. 2 वर्षे बांधकाम बंदीचा निर्णय घेतलेला नाही. देशभरात बांधकामांवर बंदीचा व्हायरल मेसेज खोटा. व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवू नका. सरकारनेही लोकांना अशा बातम्यांची पडताळणी केल्यानंतरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केलंय. 2 वर्षे बांधकाम बंदीचा निर्णय नीती आयोगाने घेतलेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय.`

Construction Ban: देशात बांधकामांवर 2 वर्षे बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
America- Iran: मोठी बातमी! अमेरिका-इराण शांतता चर्चा अयशस्वी, इराणला अटी मान्य नाही, आता डोनाल्ड ट्र्म्प काय निर्णय घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com