Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार

Iran Shuts Strait of Hormuz Again: इराणने पुन्हा मोठा निर्णय घेतला त्यामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. याचा फटका भारताला देखील बसणार आहे. इराणने हा निर्णय का घेतला यामागचे कारणही सांगितले.
Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार
Iran Leader Mojtaba Khamenei Latest News UpdateSaam Tv
Published On

Summary -

  • इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली

  • अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला

  • जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

  • भारतात इंधन दर वाढण्याची शक्यता

इराण आणि अमेरिकेमधील वाद काही संपला नाही. अशातच इराणने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. याचा फटका भारतासह संपूर्ण देशाला बसणार आहे. इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. अमेरिकेने आपले वचन मोडल्याचा आरोप करत इराणने हा निर्णय घेतला आहे. इराणच्या माध्यमांनी लष्कराच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले. इराणने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी करून ठेवली आहे. त्यामुळेच आम्हाला हा निर्णय घेण्यास भाग पडावे लागले.

इराणने यापूर्वीही इशारा दिला होता की, जर अमेरिकेने इराणी जहाजे आणि बंदरांची नाकेबंदी सुरूच ठेवली तर ते सामुद्रधुनी पुन्हा बंद करू शकतात. अमेरिकेने नाकेबंदी हटवली नाही त्यामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही नाकेबंदी गेल्या आठवड्यात इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन करते.

Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार
Iran: शक्य तितक्या लवकर इराण सोडा, युद्धविरामानंतर केंद्र सरकारकडून भारतीयांना सूचना जारी; नेमकं काय म्हणाले?

होर्मुझची सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे पुन्हा इंधनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. असे पुन्हा झाल्यास संपूर्ण जगभरामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवेल. यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराच्या बातमीनंतर शुक्रवारी तेलाच्या किमती घसरू लागल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, जगभरामध्ये एकूण तेल पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केला जातो. अशामध्ये सामुद्रधुनी पुन्हा बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. जर असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते आणि परिणामी इंधनाचे दर देखील वाढतील.

Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार
Iran: मोठी बातमी! जगाला पुन्हा हादरा बसला, इराणने घेतला मोठा निर्णय; भारतालाही बसणार फटका

दरम्यान, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्राइल आणि अमिरिकेने इराणवर हल्ला केल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने यापूर्वी सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली राहील असे सांगितले होते. पण आता त्यांनी सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना धक्का बसला. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडरने शनिवारी स्पष्टपणे सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण पूर्ववत झाले आहे. सामुद्रधुनी आता सशस्त्र दलांच्या कडक देखरेख आणि नियंत्रणाखाली आहे. जोपर्यंत इराणी बंदरांवर घातलेली अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहिल तोपर्यंत या जलमार्गातून होणारी जलवाहतूक रोखली जाईल.

Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार
America- Iran: मोठी बातमी! अमेरिका-इराण शांतता चर्चा अयशस्वी, इराणला अटी मान्य नाही, आता डोनाल्ड ट्र्म्प काय निर्णय घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com