

राजस्थानमध्ये बांधकाम साईटवर उत्खनन करताना मातीचा ढिगारा कोसळला
या भीषण दुर्घटनेमध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला
घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले
मातीखाली अजून काही कामगार अडकल्याची भीती
राजस्थानच्या भिवाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली. बांधकाम साईटवर खोदकाम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील भिवाडी येथील दिल्ली-जयपूर महामार्गानजीक ही घटना घडली. कापडियावास येथील सिग्नेचर ग्लोबल बिल्डर्स सोसायटीमध्ये खोदकाम करताना अनेक कामगार मातीखाली गाडले गेले. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सात कामगारांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-जयपूर महामार्गावरील हॉटेल रावसमोर असलेल्या सिग्नेचर ग्लोबल सोसायटीमध्ये उत्खननाचे काम सुरू होते. खोदकाम करत असताना अचानक माती कोसळली आणि त्यात अनेक कामगार अडकले. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू झाले. मातीखाली गाडल्या गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सर्व मृतदेह भिवाडी येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून रात्री ९:३० वाजताच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. अशा निष्काळजीपणाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. या विलंबामुळे कामगारांच्या बचावकार्याला सुरुवात होण्यास सुमारे अडीच तास उशीर झाला. जर जिल्हा प्रशासनाला वेळीच माहिती मिळाली असती तर कामगारांचा जीव वाचवण्यात यश आले असते.
मातीखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच कामगारांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी गर्दी करत आक्रोश केला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल रण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे देखील स्थानिकांनी सांगितले. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चिखलाखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.