

पुण्यात महिला नगरसेविकेची तक्रार
महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाचे अश्लील कृत्य
पोलिसांत गुन्हा दाखल
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुण्यात संतापजनक प्रकार घडला आहे. महाविद्यालयाच्या बाहेर मुलींकडे बघून अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला नगरसेविकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक केली.
महापालिका अधिकाऱ्याचा मुलगा हा महाविद्यालयाच्या बाहेर वाहनात बसून मुलींकडे बघून अश्लील कृत्य करायचा. त्याच्या असा प्रताप करण्याची दुसरी वेळ आहे. प्रणव केदार वझे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी वझे याचे वडील पुणे महापालिकेत कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवने अश्लील कृत्य ४ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता पुण्यातील नामांकित महाविद्यालयाच्या बाहेर केले. आरोपी प्रणव हा वारंवार शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारात कारमध्ये बसायचा. त्यानंतर पँट गुडघ्यापर्यंत काढून समोर मोबाइल धरून मुलींकडे बघत अश्लील चाळे करायचा. पुणे महापालिकेतील भाजप महिला नगरसेविकेने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाने हा प्रताप यापूर्वी देखील काहीवेळा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचे वडील पुणे महापालिकेतील पथ विभागात कार्यरत आहेत. भाजप नगरसेविकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रणवच्या मुसक्या आवळल्या.
पालिका अधिकार्याच्या मुलाच्या कृत्याने कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुणाला अटक केल्यानंतर कॉलेज परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे. कॉलेजसमोर संतापजनक प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.