

नागपूरच्या खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या
सागर वानखेडे या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
आरोपी पती राजू गजभिये आणि पत्नी सोनाली गजभिये पोलिसांच्या ताब्यात
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर नवरा-बायकोकडून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर वानखेडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी हत्या करणारे पती राजू गजभिये आणि पत्नी सोनाली गजभिये यांना ताब्यात घेतलं आहे. दोघांनी मिळून सागर वानखेडेची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडली आहे. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मेसेज केला.
आज गुरुवारी सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले, त्यावेळी सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली. सागरने बाईक थांबवताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागर वर अनेक वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.