महाविकास आघाडीचं ठरलं; कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी? संयुक्त पत्रकार परिषदेत नावाची घोषणा

mva rajya sabha candidate : महाविकास आघाडीने राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. महाविकास आघाडीने शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
mva rajya sabha news
mva rajya sabha candidateSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात १६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होणार

राज्यातील ७ पैकी ६ जागांवर महायुतीची तयारी

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी

महाराष्ट्रातील राज्यसभेतील ७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महायुतीने ७ पैकी ६ जागांवर जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा जिंकण्याची संधी आहे. महाविकास आघाडीने राज्यसभेच्या एक जागेसाठी शरद पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभेसाठी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यसभा उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली.

खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर सुळे यांनी आज बुधवारी काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळे यांची काँग्रेस नेत्यांशी गांधी भवनात महत्वाची चर्चा झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

mva rajya sabha news
क्रिकेट विश्वावर शोककळा, दिग्गज खेळाडूच्या वडिलांचं निधन

या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याने शरद पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाचे आभार मानते. सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी इत्यादी यांचे सर्वांचे आभार मानते. सर्व काँग्रेस नेत्यांचे आभार मानते. मी आणि जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन तास चर्चा केली. काँग्रेस, शिवसेनेने मोठ्या मनाने शरद पवार यांना संधी दिल्याने आभार मानते. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करत आहे.

mva rajya sabha news
श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; तब्बल १०१ जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

'आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्रात जेव्हा आव्हाने येतात, तेव्हा आम्ही एकत्र येतो. आम्ही सातत्य ठेवून काम करत राहणार आहोत. शरद पवारांवर डॉक्टरांनी चांगले उपचार केले. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. पुढील काही दिवसांत, तुम्हाला माहीत आहे की शरद पवार दौरे करण्यासाठी किती उत्सुक असतात. ते महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेला लागतील, असेही सुळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com