

दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
संगकाराचे वडील क्षेमा संगकारा यांचे निधन
संगकाराच्या वडिलांवर ४ मार्च रोजी होणार अंत्यसंस्कार
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुमार संगकाराचे वडील क्षेमा संगकारा यांचं निधन झालं. ते एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे कुमार संगकारा सारखा दिग्गज क्रिकेटपटू जगाला लाभला. संगकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. संगकाराच्या वडिलांच्या पार्थिवावर ४ मार्च रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कुमार संगकाराचे वडील क्षेमा कँडी शहरात नावाजलेले व्यक्तिमत्व होते. ते क्रिकेटपटू नव्हते. परंतु कुमार संगकाराचे पहिले कोच होते. त्यांनी कुमार संगकारा आणि त्यांच्या भावांना तासंतास प्रशिक्षण दिलं आहे.
कुमार संगकारा कुटुंबीयांकडून जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं की, 'आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे की, वकील क्षेमा संगकारा यांचं निधन झालं आहे. क्षेमा यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आठवणी कुटुंब, मित्र, साथीदारांकडून नेहमी लक्षात ठेवल्या जातील'.
कुमार संगकाराला श्रीलंका क्रिकेट इतिहासात चांगला खेळाडू बनवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी विशेष योगदान दिलं आहे. संगकाराने क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर भाषणातून वडिलांचेही आभार मानले होते. कुमार संगकारा सध्या आयपीएल टीमचा हेड कोच आणि डायरेक्टर म्हणून काम करत आहे. माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा यांच्या वडिलांचं निधन झाल्याने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.
एका चाहत्याने म्हटलं आहे की, क्षेमा संगकारा यांच्या निधनाचं वृत्त समजताच दु:ख झालं. ते प्रसिद्ध वकील, कुमार संगकाराचे वडील आणि पहिले कोच होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुमचं क्रिकेट आणि क्रिकेटला दिलेलं योगदान कधीही विसरणार नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.