श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; तब्बल १०१ जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

west asia crisis : श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजातून तब्बल १०१ जण बेपत्ता झाले आहेत.
west asia crisis
representative imageSaam tv
Published On
Summary

इराणी नौदलाच्या जहाजावर घडली हल्ल्याची घटना

जहाजातील १०१ जण बेपत्ता, ७८ जखमी

३२ जणांची प्रकृती गंभीर, श्रीलंकेच्या नौदलाकडून तातडीने बचावकार्य

इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान एक मोठी घटना समोर आली आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणी नौदलाच्या जहाजावर पाणबुडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झाल्यानंतर १०१ जण बेपत्ता झाले आहेत. तर ७८ जखमी झाले आहेत. त्यापैकी ३२ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

west asia crisis
लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

भारतातील विशाखापट्टणम येथील मिलान २०२६ बहुराष्ट्रीय नौदल सरावात हे जहाज सहभागी झालं होतं. त्यानंतर इराणला परतताना हल्ला झाल्याचे सांगण्यात आलं आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रीय मंत्री विजिता हेराथ यांनी संसदेत माहिती दिली आहे की, जहाजावर हल्ला झाल्याचा फोन आला. त्यानंतर श्रीलंकेच्या नौदल आणि हवाई दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं. आतापर्यंत ३२ जणांना वाचवण्यात आलं आहे'. दरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाच्या जवानांनी ३२ जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

श्रीलंकेच्या नौदलाच्या सूत्रांनी सांगितलं की, 'जहाजावर एकूण १८० जण होते. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं. या हल्ल्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु या हल्ल्याचं कनेक्शन अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीशी जोडलं जात आहे.

west asia crisis
जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाच्या बॅगेतील पिस्तुल, 29 जिवंत काडतुसांची चोरी; मुंबईत खळबळ

तत्पूर्वी, युद्धाच्या पाचव्या दिवशीही अमेरिका इस्त्रायलने तेहरानसह अनेक शहरांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इराणनेही इस्त्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या घटनेने आखाती देशात तणाव वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com