लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

pune divorce case : कुठल्यातरी चित्रपटाचं कथानकाला साजेशी बातमी समोर आलीये... विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यात घटस्फोट मिळण्यासाठी चक्क पत्नीने पतीला रक्कम दिलीय... पाहूयात या रिपोर्टमधून...
pune news
pune divorce case Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

कायद्याने घटस्फोटानंतर मागणीनुसार पत्नीला पतीकडून पोटगी मिळत असल्याचे सर्वश्रुत आहे. जर घटस्फोट मिळण्यासाठी पत्नीने पतीला रक्कम दिली तर?. ऐकून काहीसे विचित्र वाटलं ना. असंच काहीसं घडलंय विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात. विशेष विवाह कायद्यानुसार प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिनं थेट घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.

एकाच गल्लीत राहत असल्याने या दाम्पत्यानं पळून जाऊन 19 एप्रिल 2024 ला कोर्ट मॅरेज केलं. मात्र, लग्नानंतर दोघांनाही वेगळं राहणं परवडत नसल्यानं मुलीनं आपल्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर विरोध झाला आणि ती आपल्या घऱच्यांच्या विरोधाला तोंड देऊ शकली नाही. अखेर कुटुंबाच्या दबावाखाली तिनं कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली.

pune news
नराधम शिक्षकाकडून आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर झाला भंडाफोड, अहिल्यानगरमध्ये खळबळ

मात्र, तरुण तिला नांदवायला तयार होता. पण, तिला नांदायचे नव्हते. अखेर त्याला कारण नसताना कोर्टात खेचत तिनेच त्याला 50 हजार रुपये खटल्याचा खर्च द्यायचा, अशी अट टाकली आणि तिने रक्कम देण्याचे मान्य केल्याने दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.

pune news
ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

अगदी चित्रपटाच्या कथानकासारखं वाटणाऱ्या बातमीमुळे वाढत्या घटस्फोटाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. पुण्यातील या प्रकरणाने पुन्हा एकदा नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 50 हजार रुपयांत झालेला हा घटस्फोट केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर बदलत्या सामाजिक वास्तवाचंही प्रतिबिंब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com