

UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये एकांशने मिळवला ऑल इंडिया तिसरा क्रमांक
एकांश हा हरियाणाचे भाजप नेते कृष्ण ढुल यांचे पुत्र
एकांशने याआधी UPSC मध्ये 342 आणि 296 असे क्रमांक मिळवले होते
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा (CSE)2025 निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदा झालेल्या परीक्षेत अनुज अग्निहोत्रीने पहिला रँक मिळवला आहे. तर हरियाणाच्या पंचकुला येथील एकांश ढुल याने ऑल इंडिया तिसरा रँक पटकावला आहे. एकांश याआधी दोन वेळा यूपीएससी परीक्षा पास झाला आहे.
एकांशने २०२४ साली जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत ३४२ वा रँक पटकावला होता.२०२५ साली जाहीर झालेल्या परीक्षेत २९६ वा क्रमांक पटकावला होता. तर आता २०२६ साली जाहीर झालेल्या निकालात तिसरे स्थान पटकावलं आहे. एकांश ढुल यांचे वडील कृष्ण ढुल हे हरियाणातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आहेत. तसेच हरियाणा धनुर्विद्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. एकांशची आईचे नाव निर्मला ढूल असून त्या सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत.
एकांशची शालेय शिक्षण चंदीगडच्या भवन विद्यालयात झालं. त्याने त्या शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण केले. तर संत कबीर पब्लिक शाळेत बारावीचे शिक्षण घेतलं. पुढे उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेला. त्याने दिल्लीतील प्रसिद्ध श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए (ऑनर्स) पूर्ण केलं.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एकांश ढुल यास फोन करून अभिनंदन केलं. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटलं की, एकांशसारख्या तरुणांचे यश विकसित भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी मजबूत आधारस्तंभ ठरणार आहे. यावेळी त्यांनी ९५८ उमेदवारांना देखील देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या'.
यंदा झालेल्या परीक्षेत एकूण ९५८ उमेदवारांची निवड झाली आहे. यात ३१७ खुला वर्ग, ३०६ ओबीसी, १५८ एससी, १०४ ईडब्लूएस, ७३ एसटी असे एकूण ९५८ उमेदवारांची निवड झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.