'डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला, त्यामुळे...; राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची सोशल मीडियावर खास पोस्ट

Sharad pawar news : राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. त्यांनी जनता आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar newsSaam tv
Published On
Summary

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची उमेदवारी

उमेदवारी मिळाल्यानंतर शरद पवार यांची सोशल मीडियावर खास पोस्ट

पवारांनी महाराष्ट्रातील जनता आणि मित्रपक्षांचे मानले आभार

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांपैकी १ जागा जिंकण्याची महाविकास आघाडीला संधी आहे. महाविकास आघाडीने या जागेसाठी शरद पवार यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राची जनता आणि मित्रपक्षांचे मनापासून ऋणी मानले मानले आहेत.

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची फेसबुक चर्चेत आली आहे. शरद पवार यांनी फेसबुक पोस्टमधून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

शरद पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास १९६७ सालापासून सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झालं.

मला १९६७ साली पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. मला केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मिळाली. सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्र आणि देशासाठी सकारात्मक काम करता आले. यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिलंय.

Sharad Pawar
मोठी बातमी! राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी दिलीये. खरंतर माझ्यावर मोठा विश्वास दाखवलाय. या विश्वासाबद्दल महाराष्ट्राची जनता आणि माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा प्रयत्न असेल.

Sharad Pawar
मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्र्यांना खासदार झाल्यावर कोणते खाते मिळणार?

सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नाहीये, त्यामुळे पत्रकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवतोय. राज्यातील जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com