Delhi CJP Protest : भाजप नेत्याच्या मुलीला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण आलं समोर

Delhi CJP Jantar Mantar Protest News : दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीच्या आंदोलनादरम्यान माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंहसह दोन हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Delhi CJP Protest News
Delhi CJP Protest NewsSaam tv
Published On: 
Summary
  • दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी दोन हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात

  • माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले

  • यशस्विनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीसह दोन हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यशस्विनीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

यशस्विनी राजे सिंह हिने दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराजवळील एका उद्यानात बसलेली असताना दिल्ली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सध्या ती केशवपूरम पोलीस ठाण्यात असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Delhi CJP Protest News
Tea Tips : चहासोबत चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ! नाहीतर आजारांना मिळेल आमंत्रण

कोण आहे यशस्विनी राजे सिंह?

यशस्विनी राजे सिंह ही उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमध्ये तिने सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी यशस्विनीने सीजेपी अभियानालाही पाठिंबा दिला होता.

Delhi CJP Protest News
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सीजेपीचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआर परिसरात ९ ऑक्टोबरपासून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राजधानीत ४० हजारांहून अधिक दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) जवान तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक प्रमुख ठिकाणी बॅरिकेड्स आणि स्पाइक स्ट्रिप्स लावून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते.

Delhi CJP Protest News
Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ताब्यात घेतले

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ममता बॅनर्जी यांना साऊथ अव्हेन्यू परिसरात पक्षाच्या खासदारांसह रोखण्यात आले. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव केल्यानंतर त्या बसथांब्यावर बसल्या. त्यानंतर त्यांना खासदार डेरेक ओ'ब्रायन आणि डोला सेन यांच्यासह पोलीस बसमधून नेण्यात आले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी तोंडावर पट्टी बांधून पोलीस कारवाईचा निषेध नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com