Alisha Khedekar
चहा बनवल्यानंतर उरलेला चहाचा चोथा कचऱ्यात फेकण्याऐवजी घरातील झाडांसाठी योग्य पद्धतीने वापरता येतो.
चहाचा चोथा पाण्याने चांगला धुवा. धुतलेला चहाचा चोथा उन्हात पूर्णपणे वाळवा. ओलसर चोथा थेट कुंडीत टाकल्यास बुरशी येऊ शकते.
वाळलेला चोथा थोड्या प्रमाणात कुंडीतील मातीमध्ये मिसळा. यामुळे मातीमध्ये सेंद्रिय खत वाढण्यास मदत होऊ शकते.
चहाचा चोथा वारंवार वापरण्याऐवजी आठवड्यातून एकदाच थोड्या प्रमाणात वापरा. आणि नेहमी झाडाच्या वाढीवर लक्ष ठेवतं राहा.
घरातील शोभेची झाडे, काही फुलझाडे आणि इतर कुंडीतली झाडे यांच्या वाढीसाठी हा चोथा उपयुक्त ठरू शकतो.
योग्य प्रमाणात आणि स्वच्छ चोथा वापरल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही लावलेली झाडे भरभर वाढू शकतात. त्यामुळे हा घरच्या घरी उपाय नक्की ट्राय करा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा