भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

Big Political Shake-Up Annamalai Quits BJP Sparks Exodus In Tamil Nadu: तमिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
Former BJP Tamil Nadu chief Annamalai announces resignation, triggering a wave of exits and a major political shift in the state.
Former BJP Tamil Nadu chief Annamalai announces resignation, triggering a wave of exits and a major political shift in the state.saam tv
Published On

भारतीय जनता पक्षाला आज तमिळनाडूमध्ये दुहेरी धक्का बसला असून पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष करुणा नागराजन आणि प्रदेश सचिव सुमती व्यंकटेश यांनीही आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. नागराजन यांनी अण्णामलाई यांच्या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र सुमती यांनी अद्याप आपल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.

Former BJP Tamil Nadu chief Annamalai announces resignation, triggering a wave of exits and a major political shift in the state.
Rain Alert india : पुढील २ दिवस सतर्क राहा! १७ राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट, गारपीटीचा तडाखाही बसणार

या तीन दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याआधी राज्यात आक्रमक राजकीय शैलीमुळे आणिद्रमुक पक्षांना थेट आव्हान दिल्यामुळे के अण्णामलाई यांना मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी देखील राजीनामा दिला आणि नवीन पक्ष स्थापन करणार असून तमिळनाडूमध्ये पुढील निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले आहे.

Former BJP Tamil Nadu chief Annamalai announces resignation, triggering a wave of exits and a major political shift in the state.
Maharashtra Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका, आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलिसांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

माझ्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे,

पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर आहे, असे अण्णा मलाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले. आपण सन्मानपूर्वक भाजप सोडले असून आजपासून एक नवा मार्ग, एक नवी चळवळ, एक नवी मोहीम सुरू करणार असल्याचे अण्णा मलाई म्हणाले.

Former BJP Tamil Nadu chief Annamalai announces resignation, triggering a wave of exits and a major political shift in the state.
मोठी बातमी! तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच कोर्टात पोहचला, नेमकी काय केली याचिका?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या तामिळनाडूचे भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. अण्णामलाई यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान भाजपने म्हटले आहे की अण्णामलाई यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही. अण्णामलाई म्हणाले की, ते जी नवीन चळवळ सुरू करणार आहेत, तिला नवीन आकार आणि तळागाळातील एक नवीन दृष्टिकोन असायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com