मोठी बातमी! तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच कोर्टात पोहचला, नेमकी काय केली याचिका?

TVK Government Formation : तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. TVK प्रमुख थलपती विजय यांनाच सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Tamil Nadu government formation : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय... 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या TVKचे प्रमुख विजय थलपती यांनाच सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी मागणी करण्यात येतेय... यासाठी याचिकाही दाखल करण्यात आलीय. वकील एझिलारासी पी. यांनी ही रिट याचिका दाखल केलीय... राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आलीय... मात्र अद्यापही राज्यपालांनी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही.

तामिळनाडूत सत्तास्थापनेचा पेच वाढलाय. AMMKच्या टीटीव्ही दिनकरण यांनी थलपती विजय यांच्या पक्षावर 'बनावट पत्र' दिल्याचा आरोप केलाय. आपल्या आमदाराचं खोटं समर्थन पत्र राज्यपालांना दिल्याचं दिनकरण म्हणाले. या प्रकरणी त्यांनी चेन्नईतील पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. विजय यांच्या पक्षानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com