K Annamalai : भाजपला मोठा धक्का, के. अन्नामलाई यांचा राजीनामा; नव्या राजकीय पक्षाची घोषणा

K Annamalai Resign From BJP : तमिळनाडू भाजपाचे प्रमुख नेते के. अन्नामलाई यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
K ANNAMALAI RESIGNS FROM BJP | BIG POLITICAL SHAKE-UP IN TAMIL NADU
K ANNAMALAI RESIGNS FROM BJP | BIG POLITICAL SHAKE-UP IN TAMIL NADUSaam Tv
Published On
Summary
  • तामिळनाडूच्या राजकारणातील मोठी बातमी

  • के. अन्नामलाई यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा स्वीकारला

  • अन्नामलाई यांनी नव्या पक्षाची घोषणा केली

  • 'वी द लीडर्स' या नावाने सुरु केला नवा पक्ष

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तमिळनाडूमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते के. अन्नामलाई यांनी अखेर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारला असून याबाबत पक्षाने अधिकृत पत्रक जारी केले आहे. भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर 'वी द लीडर्स' नावाचा त्यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

राजीनाम्यापूर्वी अन्नामलाई यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितले होते. विशेष म्हणजे, ते दिल्ली विमानतळाकडे रवाना होत असतानाही त्यांना पुन्हा बोलावण्यात आले होते. मात्र, अन्नामलाई यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत राजीनाम्याचा निर्णय कायम ठेवला.

K ANNAMALAI RESIGNS FROM BJP | BIG POLITICAL SHAKE-UP IN TAMIL NADU
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , अन्नामलाई यांनी भाजपासमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय म्हणजे त्यांना पुन्हा तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे आणि पुढील सात वर्षे पक्षाच्या कामकाजात पूर्ण स्वायत्तता द्यावी.

K ANNAMALAI RESIGNS FROM BJP | BIG POLITICAL SHAKE-UP IN TAMIL NADU
Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

दुसरा पर्याय म्हणजे त्यांना स्वतंत्र राजकीय मार्ग निवडण्याची मुभा द्यावी. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांची पहिली अट मान्य न केल्याने त्यांनी भाजपामधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. अन्नामलाई हे तमिळनाडूमध्ये भाजपाचा चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी आक्रमक प्रचार मोहीम राबवली होती आणि राज्यातील अनेक तरुणांना भाजपाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com