Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

Navi Mumbai Kharghar Crime News : नवी मुंबईत एका सलूनमध्ये हेअर स्पासाठी आलेल्या विवाहित महिलेचा सलून मालकाने जबरदस्तीने किस घेतल्याचा प्रकार घडला आहे. खारघर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
KHARGHAR SALON OWNER BOOKED AFTER WOMAN ALLEGES FORCED KISS DURING HAIR SPA IN NAVI MUMBAI
KHARGHAR SALON OWNER BOOKED AFTER WOMAN ALLEGES FORCED KISS DURING HAIR SPA IN NAVI MUMBAISaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईतील खारघरमध्ये धक्कादायक प्रकार

  • एका सलूनमध्ये हेअर स्पा करताना विवाहित महिलेसोबत गैरवर्तन

  • सलून मालकाने जबरदस्तीने किस घेतल्याचा प्रकार

  • खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी मुंबई, विकास मिरगणे

Navi Mumbai Kharghar Saloon News तुम्हीसुद्धा पार्लरमध्ये स्पा किंवा इतर कामानिमित्त जात असाल तर सावधान! नवी मुंबईतील खारघर परिसरात एका सलूनमध्ये हेअर स्पासाठी आलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. हेअर स्पा करताना सलून मालकाने महिलेच्या ओठांचा किस घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित सलून मालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली (Dombivli ) येथे राहणारी ३४ वर्षीय महिला १८ मे रोजी आपल्या माहेरी कळंबोली येथे आली होती. दरम्यान, ४ जून रोजी ती खारघर सेक्टर-२ परिसरातील एका सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेली होती. तक्रारीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास सलून मालक समीर याने हेअर स्पा सुरू असताना महिलेला डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने किस घेतल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

KHARGHAR SALON OWNER BOOKED AFTER WOMAN ALLEGES FORCED KISS DURING HAIR SPA IN NAVI MUMBAI
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली. तिने तातडीने सलूनमधून बाहेर पडत आपल्या बहिणीला आणि कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडे धाव घेतली. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, घटनेनंतर सलून मालकाने हेअर स्पासाठी घेतलेले 3,300 रुपये परत पाठवले. तसेच मोबाईलवर “SO SORRY” असा मेसेजही पाठविल्याचा दावा महिलेने केला आहे. या मेसेजमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून पोलिसांकडून त्याचीही चौकशी केली जात आहे.

KHARGHAR SALON OWNER BOOKED AFTER WOMAN ALLEGES FORCED KISS DURING HAIR SPA IN NAVI MUMBAI
Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच महिलेचे पती आणि इतर नातेवाईक खारघर पोलीस ठाण्यात पोचले. त्यानंतर संबंधित महिलेनेदेखील पोलीस ठाण्यात जाऊन सलून मालकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत विविध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com