Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtr Weather Update Today News : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
MAHARASHTRA RAIN ALERT: ORANGE ALERT IN VIDARBHA AS MONSOON SET TO ENTER STATE SOON
MAHARASHTRA RAIN ALERT: ORANGE ALERT IN VIDARBHA AS MONSOON SET TO ENTER STATE SOONSaam Tv
Published On
Summary
  • केरळमध्ये मान्सून दाखल

  • महाराष्ट्रात मान्सूनला पोषक वातावरण निर्माण

  • विदर्भाला यलो तर उर्वरित राज्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Maharashtra Weather Update Today 5th June गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत होती. मात्र आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळत आहेत. आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची, तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार,आज अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट (Vidarbha Rain Orange Alert) जारी केला आहे. तसेच सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Western Maharashtra Rain Alert) याशिवाय रायगड, रत्नागिरी (Kokan Heavy Rain Alert) , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT: ORANGE ALERT IN VIDARBHA AS MONSOON SET TO ENTER STATE SOON
Beed : बीडमध्ये धक्कादायक प्रकार! कराडच्या गुंडांकडून महिलेला अमानुष मारहाण, प्रायव्हेट पार्टवर बेल्टने हल्ला

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर केरळमध्ये (Kerala Monsoon Update) प्रवेश केला आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिरा झाले असले तरी आता पावसाच्या हंगामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात कमी पावसाच्या अंदाजामुळे चिंतेत असलेल्या बळीराजासाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT: ORANGE ALERT IN VIDARBHA AS MONSOON SET TO ENTER STATE SOON
Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्रात (Maharashtra Mosnoon Update) दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होऊन अनेक भागांना पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com