Beed : बीडमध्ये धक्कादायक प्रकार! कराडच्या गुंडांकडून महिलेला अमानुष मारहाण, प्रायव्हेट पार्टवर बेल्टने हल्ला

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील रंजेगाव येथे जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्यामुळे एका महिलेवर अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
BEED HORROR: WOMAN BRUTALLY ASSAULTED FOR OPPOSING GAMBLING DEN IN RANJEGAON
BEED HORROR: WOMAN BRUTALLY ASSAULTED FOR OPPOSING GAMBLING DEN IN RANJEGAONSaam Tv
Published On
Summary
  • बीडमध्ये महिलेला मारहाण

  • आरोपी वाल्मिक कराडचे समर्थक

  • जुगाराला विरोध केल्याच्या रागातून मारहाण

  • गुन्हा दाखल करून सुद्धा अटक नाहीच

Beed Walmik Karad Goons Brutal Attack On Women बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे मानवतेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एक आरोपी संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माईंड असलेला वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात सुरू असलेल्या जुगाराच्या प्रकारामुळे लहान मुलांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तिच्या घरासमोर काही जणांकडून वारंवार लघुशंका केली जात होती. याबाबत महिलेने आवाज उठवला. याच कारणाचा राग मनात धरून आरोपींनी महिलेला मारहाण केली.

BEED HORROR: WOMAN BRUTALLY ASSAULTED FOR OPPOSING GAMBLING DEN IN RANJEGAON
Weather Update : पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रात वादळी पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी निखिल आबूज (Beed Nikhil Aabuj) आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी तिला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसू नयेत म्हणून आरोपींनी तिच्या गुप्तांगावर बेल्टने हल्ला केला. या प्रकारामुळे महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यादरम्यान महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकल्याचे समोर आले आहे. सुदैवाने मुलांना गंभीर दुखापत झाली नसली तरी त्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

BEED HORROR: WOMAN BRUTALLY ASSAULTED FOR OPPOSING GAMBLING DEN IN RANJEGAON
Monsoon Update : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्रात कधी आणि कुठे? जाणून घ्या A to Z माहिती

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी हा वाल्मीक कराडचा समर्थक असल्याचा दावा करण्यात येत असून त्यांचे एकत्र फोटोही आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com