Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

Pune Bribe Case News : पुण्यातील हडपसर येथे एसीबीने महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्याला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. वीजमीटर जोडणी मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASE
ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASESaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील हडपसर येथे धक्कादायक घटना

  • महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचून कारवाई केली

  • अधिकाऱ्याला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडलं

  • वीजमीटर जोडणी मंजुरीसाठी लाचेची मागणी

सचिन जाधव, पुणे

Pune Hadpasar ACB Caught Red Handed Ramchandra Londhe पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB ) पुणे पथकाने महावितरणच्या हडपसर उपविभाग-२ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असल्याची घटना घडली आहे. रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२) असे या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने वीजमीटर जोडणीच्या कामासाठी मंजुरी देण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एसीबीने गुरुवारी दुपारी हडपसर येथील महावितरण कार्यालयात ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणची विविध कामे करतात. त्यांनी नव्याने १२ वीजमीटर जोडणीच्या कामासाठी मंजुरी व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोंढे यांच्याकडे धाव घेतली. मात्र त्या बदल्यात प्रतिमीटर एक हजार रुपये या प्रमाणे एकूण १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार त्यांनी २ जून रोजी एसीबीकडे केली होती.

ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASE
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

तक्रारीमध्ये आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला होता. एका इमारतीच्या वीज जोडणीसंदर्भातील कामासाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले होते. या तक्रारीनंतर एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाच मागितल्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे समोर आले. पडताळणीदरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेपैकी ४ हजार ५०० रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे मान्य केल्याची माहिती एसीबीने दिली.

ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASE
Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

तसेच उर्वरित ७ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून नियोजनबद्ध कारवाई केली. गुरुवारी दुपारी तक्रारदाराकडून ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लोंढे यांना हडपसर उपविभाग-२ कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी केले. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com