Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

Delhi Crime News : दिल्लीतील शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापिकेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहे.
DEVSMITA PAUL DEATH CASE: SHIVAJI COLLEGE PROFESSOR FOUND DEAD IN DELHI FLAT, MURDER SUSPECTED
DEVSMITA PAUL DEATH CASE: SHIVAJI COLLEGE PROFESSOR FOUND DEAD IN DELHI FLAT, MURDER SUSPECTEDSaam Tv
Published On
Summary
  • शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापिका देवस्मिता पॉल यांचा संशयास्पद मृत्यू

  • त्यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला

  • पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला

  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

Delhi Univercity Shivaji College Professor Murder Case दिल्लीमधून मोठी बातमी समोर आली आहे. विद्यापीठातील एका प्राध्यापिके चा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. प्राध्यापिका देवस्मिता पॉल (४९) असे मृत शिक्षिकेचं नाव असून त्या शिवाजी महाविद्यालयात कार्यरत होत्या. गुरुवारी पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळल्याने एकचं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरु केला असून हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवस्मिता पॉल (Professor Devasmita Paul) या वसुंधरा एन्क्लेव्हमधील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. गुरुवारी सकाळपासून त्यांची बहीण देवरती पॉल त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, वारंवार फोन करूनही देवस्मिता यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे टेन्शनमध्ये आलेल्या देवरती यांनी थेट त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

DEVSMITA PAUL DEATH CASE: SHIVAJI COLLEGE PROFESSOR FOUND DEAD IN DELHI FLAT, MURDER SUSPECTED
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

फ्लॅटसमोर पोचल्यानंतर घर बाहेरून बंद असल्याचे त्यांना दिसले. घर बंद बघून संशय वाढल्याने त्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्यांना देवस्मिता पॉल यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने फ्लॅटची सखोल तपासणी करून विविध नमुने आणि पुरावे गोळा केले आहेत.

DEVSMITA PAUL DEATH CASE: SHIVAJI COLLEGE PROFESSOR FOUND DEAD IN DELHI FLAT, MURDER SUSPECTED
Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

मृतदेह शवविच्छेदनासाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पूर्व दिल्लीचे पोलिस उपायुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com